शिवभोजन थाळीसंदर्भात घेतला महत्त्वाचा निर्णय
राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या कहारामुळे सर्वत्रच भयाण संकटाचा सामना करावा लागत आहे.लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे,हॉटेल व्यवसाय,व्यापार बंद असल्यामुळे सर्व सामान्य माणसांच्या हाताला काम नसल्याने परिस्थिती बिकट झाली आहे.याच पार्श्वभूमीवर सरकारने गारवंतांच्या हितार्थ काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राज्यात पुढील तीन महिन्यांकरीता शिवभोजन थाळीचा दर 5 रुपये असणार असल्याचा निर्णय राज्य कॅबिनेटमध्ये घेण्यात आला आहे.
एपीएल केशरी रेशन कार्ड धारकांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी सवलतीच्या दराने अन्नधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे या सर्वसामान्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. इतकंच नाही तर मुंबई उपनगरातील जुहू बिचवरील खाद्यपेये विक्रेते को. ऑप. सोसायटी लि. यांना भाडेपट्टयाने मंजूर केलेल्या जमिनीच्या भुईभाडयाच्या दराबाबत यावेळी निर्णय घेण्यात आला आहे.