क्राईम

डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी

8 July :- कोरोना महामारीच्या योद्धे म्हणून संबोधल्या जाणाऱ्या डॉक्टरांसोबत गैरवर्तन करणे योग्य नाही.दिवसरात्र स्वतःच्या प्राणांची स्वतःच्या कुटुंबाची तमा न बाळगता सर्व सामान्यांसाठी झटणारे डॉक्टर सध्या ईशवरापेक्षा कमी नाहीत.एका महिलेचा इको चाचणीचा रिपोर्ट दिला नाही.महिलेची इको चाचणी काही कारणास्तव झालीच नसल्याने तिचे रिपोर्ट देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे रुग्णालयाचे म्हणणे होते.

याच कारयावरून वाद वाढला आणि नागपुर येथील सुप्रसिद्ध एलेक्सिस रुग्णालयामध्ये पाच ते सहा जणांना गोंधळ घालत,दमदाटी करून डॉक्टर जीवे मारण्याची धमकी दिली आहे.रुग्णालयात बुलडोझर आणून रुग्णालयाची भिंत पाडण्याचीही धमकी दिली. याप्रकरणी साहिल सय्यद नावाचा सामाजिक कार्यकर्ता आणि इतर 5 जणांवर मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.