तुकाराम मुढेंवर गंभीर आरोप!
8 जुलै :- तुकाराम मुंढे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडत आहे.२०२० तुकाराम मुंढे यांच्याकरीत त्रासदायक असल्यागत वाटत आहे.नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर महापालिकेतील सत्ताधारी भाजपनं भ्रष्टाचाराचा आणखी एक गंभीर आरोप केला आहे.
‘सी डॅट’ कंपनीला चुकीच्या पद्धतीनं कंत्राट दिलं, स्मार्ट सिटी कंपनीचं काम करणाऱ्या एल & टी कंपनीवर दबाव आणून सी डॅट कंपनीला 2 कोटी 80 लाखांचे बेकायदा काम देण्यास दबाव आणला, असा आरोप मनपाच्या विधी समितीचे सभापती धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे.या प्रकरणाची राज्य शासनाकडे तक्रार केली जाणार असून राज्य शासनानं चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणीही मेश्राम यांनी केली आहे.