राजीव गांधी फाउंडेशनची होणार चौकशी
8 जुलै :-
भारत-चीन सीमावादानंतर राजीव गांधी फाउंडेशनला 2005-06 दरम्यान चीनकडून झालेल्या फंडिंग बाबत भाजपने प्रश्न उपस्थित केले होते, आता याप्रकरणी गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी गृहमंत्रालयाची समिती नेमण्यात आली आहे. राजीव गांधी फाउंडेशन,राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट, इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट या तीनही संस्था थेट गांधी कुटुंबाशी निगडीत आहेत.
राजीव गांधी फाऊंडेशन, राजीव गाधी चॅरिटेबल ट्रस्ट या दोन्ही संस्थांच्या अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी काम पाहतात. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, राहुल गांधी हे या फाऊंडेशनचे सदस्य आहेत. शिवाय इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टचं कामही सोनिया गांधीच पाहतात. या तीनही संस्थांमध्ये मनी लॉंड्रिंग झालंय का? किंवा इन्कम टॅक्सचे घोटाळे झालेत का? विदेशी मदतीच्या नियमाचं उल्लंघन झालंय का? हे तपासून पाहिलं जाणार आहे.