सिनेमा,मनोरंजन

अन्यथा माधुरी,अक्षय,कंगना सारखे कलाकार स्टार नसते!

७ जुलै :- हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमच्या मुद्द्याला चांगलेच उधाण आले. हिंदी चित्रपट सृष्टीला अनेक बड्या स्टार दिग्दर्शकांवर,अभिनेत्यांवर,निर्मात्यांवर सोशल मीडियावर टीका करण्यात आली.बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या स्टार किड्सना नेटकऱ्यांनी टीकेचं केंद्रबिंदू ठरवलं.याच पार्श्वभूमीवर बोलताना प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी बॉलिवूडमध्ये नेपोटिझम नसल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात बोलताना संजय लीला भन्साळी म्हणाले की, ‘जर बॉलीवूडमध्ये नेपोटिझम असत तर माधुरी दीक्षित, कंगना रनौत, अक्षय कुमार यांसारखे कलाकार मोठे स्टार बनले नसते. एवढचं नव्हेतर ते एक यशस्वी निर्माता दिग्दर्शक झाले नसते. इंडस्ट्रीमध्ये मेहनत करणाऱ्या व्यक्तिला काम मिळतं आणि सुशांतने देखील आपल्या मेहेनतीन इंडस्ट्रीमध्ये काम मिळवलं होत.’