महाराष्ट्र

राज्यात कोरोनाचा कहर कायमच!

७ जुलै :- राज्यात कोरोनाचा कहर आजही कायमच आहे.राज्यात आज 5 हजार 134 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 2 लाख 17 हजार 121 इतकी झाली आहे. आज 3 हजार 296 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 1 लाख 18 हजार 558 रुग्णांना बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान राज्यात एकूण 89 हजार 294 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तर राज्यभरात आज 224 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.