सीबीएसई बोर्डने घेतला मोठा निर्णय!
७ जुलै :- कोरोना विषाणूचा वाढता कहर लक्षात घेता सध्यातरी लवकरात लवकर स्कूल सुरु होतील असे चित्र दिसत नाही.सध्या सर्वत्र अनिश्चित वातावरण सर्वत्र निर्माण झाले आहे.याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांवर अभयासक्रमाचा भार पडू नये म्हणून सीबीएसई बोर्डने 30 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सीबीएसई इयत्ता 9 ते 12 चा अभ्यासक्रम 2020-21 शैक्षणिक वर्षासाठी 30 टक्के कमी करणार असून महत्त्वाच्या विषयांच्या कन्स्पेट अभ्यासक्रमात राहणार आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे. नॅशनल काउंसिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने (एनसीईआरटी) सीबीएसई बोर्डला सुधारित अभ्यासक्रम तयार करण्यास मदत केली आहे. कोरोनाच्या संसर्ग वाढत असताना ऑनलाईन शिक्षण दिलं जात आहे. त्यात विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करता यावा व विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी महत्वाचा निर्णय सीबीएसईने घेतला आहे.