बीड- आजही धक्कादायक रिपोर्ट
बीड ७ जुलै :- बीड जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा वेग चांगला वाढला असून रोज बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याचे दिसून येत आहे.आजही बीड जिल्ह्यातून सर्वाधिक २८८ स्वॅब तपासणीकरिता स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होती.स्वॅबचा अहवाल आला असून २८८ स्वॅबपैकी 13 स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत तर यामध्ये बीड शहरातील 3 रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे.
आज 13 पॉझिटिव्ह
आजचे स्वॅब – 288
निगेटिव्ह – 273
अनिर्णित – 02
02 देवीलिमगाव ता आष्टी – 04 वर्षीय पुरुष, 08 वर्षीय स्त्री
03 -बीड शहर-63, 78 वर्षीय पुरुष , 60वर्षीय स्त्री
05 -परळी शहर – 29, 20, 25 ,वर्षीय पुरुष,50,52 वर्षीय स्त्री
03- अंबाजोगाई-38, 22, 30 वर्षीय पुरुष