राजकारण

मातोश्रीवरील भेटीबाबत पवारांनी केला खुलासा!

7 जुलै:- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटी नंतर राज्यात सर्वत्र अनेक तर्क-वितर्क लावत चर्चा सुरु झाल्या होत्या.याबात शरद पवारांनी पत्रकार परिषदेत बोलताना खुलासा केला आहे.शरद पवार म्हणाले माझ्या एका मुलाखतीचं रेकॉर्डिंग मातोश्री जवळ होतं. माझं काम आटोपल्यावर मुख्यमंत्र्यांना मातोश्री वर जाऊन सहज भेट दिली.ही नेहमीसारखीच भेट होती.त्यात वेगळं असं काही नव्हतं. मुख्यमंत्र्यांशी वारंवार भेटणं होत असतं त्याचे उगाच अर्थ काढू नका असंही ते म्हणाले.