क्रीडा

केदारने पाठवले खास पत्र

७ जुलै :- भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी कर्णधार,विकेट किपर,बेस्ट फिनिशर एकंदरीत भारतीय क्रिकेट संघाचं फुल्ल पॅकेज म्हणून लोकप्रिय असणाऱ्या महेंद्रसिंग धोनीचा आज वाढदिवस असल्यामुळे जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. माहीच्या वाढदिवसा निमित्त भारताचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधवने बर्थ डे गिफ्ट म्हणून धोनीला खास पत्र लिहिलं आहे.

क्रिकेट कसं खेळायचं हे शिकवतानाच आयुष्य कसं जगायचं हेही तुम्ही शिकवलंत असं केदार जाधवने पत्रात म्हटलं आहे. त्याने हे पत्र ट्विटरवर शेअर केलं आहे.केदार आणि धोनी यांची चांगली मैत्री आहे. केदार जाधवने वेळोवेळी धोनीचं कौतुक केलं आहे, त्याचे आभारही मानले आहेत. त्यामुळेच आज धोनीच्या वाढदिवसाचं निमित्त साधत केदारने त्याच्या भावना पत्राद्वारे व्यक्त केल्या आहेत.