कोरोनाने घेतला शिवसेना नगरसेवकाचा बळी
७ जुलै :- कोरोनाचा कहर सर्वत्र सुरु असल्याने साध्य जगणे कठीण झाले आहे.कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.कोरोनमुक्त होणाऱ्यांची संख्या समाधानकारक असली तरी मृत्यूदार सुद्धा आता वाढत चालला आहे. आज औरंगाबाद शहरातले शिवसेनेचे नगरसेवक नितीन साळवे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.त्याच्यावर गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र आज त्यांची झुंज संपली. नितीन साळवे बालाजी नगर वॉर्डातून निवडून आले होते.