आणखी सहा महिने लागणार!
७ जुलै :- जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मूकसंचार करणे कठीण झाले आहे.अशा परिस्थितीमध्ये हाताला काम नसल्याने सर्व सामान्य माणसांवर उपासमारीची वेळ आहे.यामुळेच आता सर्वांना प्रतीक्षा लागली आहे ती म्हणजे कोरोनावर मात करणारी प्रभावी लस तयार होण्याची.पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने ऑक्सफर्डसोबत लसीच्या संदर्भात करारही केला आहे.
कोरोनावरची लस कधी येणार या प्रश्नाचं उत्तर देताना सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला म्हणाले की, “कोरोनाची लस यायला अजून किमान सहा महिने लागतील. या वर्षीच्या शेवटपर्यंत लस येणं अपेक्षित आहे.” सीरम इन्स्टिट्यूटने ऑक्सफर्डसोबत लस बनवण्यासाठी करार केला आहे. ऑक्सफर्डकडून लसीच्या सध्या मानवी चाचण्या सुरु आहेत. या चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्याचे निकाल आले की आपण लस कधी येणार यासंदर्भात बोलू शकू, असंही अदर पुनावाला यांनी सांगितलं. लस येईपर्यंत जास्तीत जास्त कोरोनाच्या चाचण्या करणं महत्त्वाचे असल्याचं अदर पुनावाला यांनी सांगितलं. पण आपल्याकडे पाहिजे तेवढ्या चाचण्या होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. कोरोनाच्या चाचण्यांसाठी आवश्यक असलेले टेस्ट किट्सचं पुरेसं उत्पादन करण्याची भारतीय कंपन्यांची क्षमता आहे. पण तेवढ्या चाचण्याच केल्या जात नाही, असं अदर पुनावाला म्हणाले.