कॅप्टन विराट संकटात!
७ जुलै :- कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे क्रिकेट विश्व् देखील ठप्प झाले आहे.देशभरात पूर्ववत स्थिती कधी होईल हे सांगणं सध्यातरी अशक्य आहे. सर्वत्रच अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच आता भारतीय संघाचा कॅप्टन विराट कोहली मोठ्या संकटात सापडला आहे. भारतीय संघाचा कॅप्टन असतानाची सार्वजनिक लाभ घेत असल्याची तक्रार संजीव गुप्ता यांनी BCCI च्या लोकपालांकडे केली आहे.
विराट कोहली हा भारतीय संघाचा कॅप्टन आहे. या पदावर असतानाही तो जाहीराती आणि इतर अनेक आर्थिक कामांमध्ये गुंतला आहे. एका पदावर असतांना असे लाभ घेता येत नाही असं संजीव गुप्ता यांनी आपल्या तक्रारीत म्हटलेलं आहे.लोढा समितीच्या शिफारसी आणि मार्गदर्शक तत्वांनुसार क्रिकेटपटूंना BCCIमधून मिळणारे आणि इतरही कंपन्यांकडून मिळाणारे लाभ तो घेऊ शकत नाही असा त्यांचा दावा आहे.या सर्व प्रकरणामुळे कोहली संकटात सापडला आहे.