महाराष्ट्र

कडक लॉकडाऊनचा इशारा!

6 जुलै : दिवस-रात्र एक करून ,मेहनत घेऊन,अनेक अक्कल युक्त्या लढवून सुद्धा राज्यात कोरोनाचा कहर कमी होत नाहीए.नागरिक खबदारीने वागत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. शासनाने लॉकडाऊन शिथिल केला आहे. मात्र, अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नाही. नागिराकांनी नियम पाळले नाहीत तर ठाणे आणि नवी मुंबईप्रमाणेच पुणे शहरातदेखील कडक लॉकडाऊन जारी करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिला.

ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे शहर तसंच ग्रामीण भागात अनेक नागरिक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर मास्क न वापरता आणि प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करता फिरत असल्याचं निदर्शनास येत आह, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.