क्राईम

सावधान! पीपीई किट घातलेला प्रत्येकजण डॉक्टर नसतो

६ जुलै :- एकीकडे प्रत्येकजण कोरोना विषाणूच्या कहारामुळे ट्रस्ट झाला आहे.आर्थिक परिस्थिती कोलमडून पडली आहे.हाताला काम नाही.रोजगार उपलब्ध होण्याचे कुठूनही संकेत दिसत नाहीत.आणि वरून आता चोरट्यांनी वेग वेगळ्या शक्कल – अक्कल लढवून चोऱ्या करण्यास सुरवात केली आहे. साताऱ्यात चोरट्यांनी इतिहासच घडवला, असं म्हणणं आता चुकीचे ठरणार नाही. कोरोनाबाधित एखादा रुग्ण आढळल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा तो संपूर्ण परिसर सील करतात. मात्र या अशाच परिसरातील सामसुमिचा फायदा उचलत चोरट्यांनी मध्यरात्रीत चक्क पीपीई किट घालून चोरी केल्याच दिसून येत आहे.

रविवार पेठेतील हिराचंद कांतीलाल ज्वेलर्स या दुकानाची भिंत फोडून तीन चोरट्यांनी आत प्रवेश केला. आतमध्ये आल्यानंतर त्यांनी दुकानातील शोकेसमध्ये लावलेले दागिने आणि आतील कपाटात असलेली दागिने असे सुमारे 78 तोळे सोने लंपास केले. विशेष म्हणजे या चोरट्यांनी कोरोनाबाधित रुग्णांना बरे करणारे डॉक्टर ज्या पद्धतीने संपूर्ण शरीर झाकतात त्या पद्धतीने त्यांनी डोक्याला प्लास्टिक पॅकबंद टोपी, मास्क, प्लास्टिक जॅकेट, हॅन्डग्लोज असे परिधान केल्याचे दिसत आहे. या चोरट्यांच्या सर्व हालचाली सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहेत.