महाराष्ट्र

गडकरींची महिलांकरीता मोठी घोषणा!

६ जुलै :- कोरोना विषाणूने देशभरात घातलेल्या थैमानामुळे संपूर्ण अर्थव्यस्था कोलमडली आहे.हाताला काम नसल्याने रोजगार पदरी पडत नाही,संसाराचा गाडा रोज पुढे कसा हाकायचा हा प्रश्न सध्या सर्व सामान्य माणसासमोर एका मोठ्या डोंगराप्रमाणे उभा आहे. उपासमारीची वेळ सध्या गोर-गरिबांवर आलेली असताना राज्याचे MSME मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे.

महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत गडकरी म्हणाले 10 लाख महिलांना आम्ही सोलर चरखा देणार आहोत. या सोलर चरख्यावर दररोज 4 तास काम केल्यानंतर प्रत्येक महिन्याला महिलेला 20000 पर्यंत रोजगार मिळू शकतो. हे सूत आमचे मंत्रालय खरेदी करेल, असे नितीन गडकरी यावेळी म्हणाले. यामुळे महिलांच्या हाताला कामही मिळेल, आणि कोरोनाच्या संकटात घर चालविण्यासाठी त्यांचा मोठा हात असेल.देशात कोरोनाच प्रादुर्भाव असताना ही घोषणा अनेक कुटुंबासाठी उपयुक्त ठरणार आहे. यातून त्यांना घरबसल्या कमावणे शक्य होणार आहे.