ट्रम्प यांचा चीनवर मोठा आरोप
6 जुलै : साऱ्या जगाला कोरोना नावाच्या विषाणूने आपल्या तालावर नाचवले आहे. आणि या कोरोना विषाणूचा जन्म चीन देशात झाला आहे.जगातील सर्वात प्रगत आणि आघाडीवर असणारा देश म्हणलं कि अमेरिका नवा समोर येत आणि याच अमेरिकेला कोरोना विषाणू समोर गुडघे टेकवण्याची वेळ आहे. चीनपासून पसरलेल्या या साथीचा परिणाम अमेरिकेला सर्वाधिक झाला आहे आणि यामुळे त्यांची यंत्रणा देखील कोलमडली आहे. यामुळे ट्रम्प सतत चीनवर टीका करत आहेत.
जगभरात कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढत असताना अमेरिका आणि चीनमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीही अनेकदा चीनला खडे बोल सुनावले आहे. यादरम्यान ट्रम्प यांनी सोमवारी पुन्हा एकदा चीनवर मोठा आरोप केला आहे. ट्रम्प यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, चीनने अमेरिका आणि संपूर्ण जगाचे बरेच नुकसान केले आहे.