महाराष्ट्र

हॉटेल्स आणि लॉजेसबाबत मोठा निर्णय!

५ जुलै :- राज्यात कोरोनाचा कहर काही केल्या कमी होत नाही म्हणून येणाऱ्या काळात सर्वाना कोरोना बरोबर जगायचे आहे.याच पार्श्वभूमीवर राज्यात आता हळूहळू अनलॉक होत असताना काही उद्योगांना परवानगी देण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे राज्यातील उद्योगधंदे पूर्णपणे बंद करण्यात आले होते.

मात्र मिशन बिगीन अगेनमध्ये काही अंशी उद्योग सुरू करण्यास मान्यता मिळाली. सलून-पार्लरला सुद्धा परवानगी देण्यात आली, भाजीपाल्या व्यतिरिक्त खरेदीसाठीसुद्धा  बाजारपेठा खुल्या करण्यात आल्या, मात्र हॉटेल व्यवसायाला परवानगी देण्यात आली नव्हती. आता राज्यभरातील हॉटेल्स आणि लॉजिंग सुरू करण्यात येणार असल्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. 8 जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मात्र रेस्टॉरंट्सना अद्याप तरी परवानगी देण्याचा निर्णय झालेला नाही.