महाराष्ट्र

सुखद! राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ

५ जुलै :-राज्यात रोज कोरोना रुग्ण वाढीचा वेग झपाट्याने वाढत आहे.मात्र आज राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याची संख्या देखील वाढली आहे.आज राज्यात 3522 कोरोनाबाधित रुग्णांना कोरोनमुक्तीची पावती भेटली आहे.रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 54, 37 टक्के एवढं झालं आहे.

रुग्ण बरे होण्याची संख्या जरी वाढली असली तरी कोरोना रुग्णांच्या संख्येचा आलेख आज देखील उंचावतच राहिला आहे. राज्यात आज 5368 एवढे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 204 जणांचा मृत्यू झाला. राज्यातल्या एकूण रुग्णांचा आकडा हा आता 2,11,987 वर गेला आहे. तर राज्यात 87 हजार 681 रुग्ण आहेत.

काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापरा…सोशल डिस्टन्स ठेवा…प्रशासनाच्या सूचनेचं पालन करा!