बीडमध्ये आजही आढळले पॉझिटिव्ह रुग्ण
बीड :- बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर चांगलाच सुरु झाला असून हा कोरोनाचा कहर काही केल्या आटोक्यात येत नसल्याचं चित्र दिसून येत आहे.आज सकाळी पाठवण्यात आलेल्या 197 स्वॅब पैकी 3 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे.
आज पॉझिटिव्ह निघालेले तिन्ही रुग्ण 01 -एसबीआय,परळी –34वर्षीय पुरुष,01-अशोक नगर,धारूर -10 वर्षीय मुलगा(मुंबई हुन आलेला)01 शिक्षक कॉलनी,मोरेवाडी,अंबाजोगाई,45 वर्षीय पुरुष (एसबीआय बँक,परळी येथील कर्मचारी) असल्याची माहिती मिळाली आहे.197 स्वॅब पैकी निगेटिव्ह – १८६ तर ८ जणांचे स्वॅब अनिर्णित आहेत.
काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापरा…सोशल डिस्टन्स ठेवा…प्रशासनाच्या सूचनेचं पालन करा!