भारत

भारतात बनलेल्या औषधाच्या मानवी चाचणी होणार सुरु!

६ जुलै :- खूप दिवसांनंतर सुखद बातमी ऐकण्यास आणि वाचण्यास मिळत आहे.जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी जगभरात प्रभावी औषधावर संशोधन युद्धपातळीवर सुरु आहे. भारताने हे औषध तयार केले असून देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांनाच ही चांगली बातमी समोर आली आहे.भारताच्या पहिल्या औषधाच्या मानवी चाचणीला लवकरच सुरुवात होणार आहे. बेळगावच्या जीवन रेखा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ही चाचणी होणार आहे. त्यासाठी 200 जणांची निवडही करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Bharat Biotech International Ltd यांनी या औषधाची निर्मिती केली आहे.ICMR आणि केंद्र सरकारने या प्रयोगाला मान्यता दिली आहे. सुरुवातीला निरोगी आणि सुदृढ अशा 200 जणांना ही लस देण्यात येणार आहे. ICMRचे तज्ज्ञ यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमित भाटे यांनी दिली.निरोगी लोकांना ही लस दिल्यानंतर त्याचे काय परिणाम होतात याचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्याचे सगळे रिपोर्ट्स हे ICMRला पाठविले जाणार आहेत. लवकरच या प्रयोगाला सुरुवात होणार आहे.