बीड

बीडकर घरबसल्या चिंतेत आणि प्रतीक्षेत!

६ जुलै :- सलग २ ते ३ दिवसांपासून सर्वाधिक संशयित व्यक्तींची थ्रोट स्वॅब तपासणीकरिता पाठवण्यात येत आहे.म्हणून बीडकरांचा दिवस चिंतेत सुरु होत आहे आणि धक्कादायक रिपोर्ट ऐकून,वाचून संपत आहे.बीड जिल्हयातील आज एकूण 197 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिली आहे.



जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढील प्रमाणे आहे.
1जिल्हा सामान्य रुग्णालय बीड -34
2)स्वाराती ग्रा वै महाविद्यालय आंबाजोगाई -4
3)उपजिल्हा रुग्णालय परळी – 38
4)उपजिल्हा रुग्णालय केज-24
5)ग्रामीण रुग्णालय माजलगाव-8
6)उपजिल्हा रुग्णालय गेवराई -7
7)ग्रामीण रुग्णालय आष्टी -3
8)CCC बीड -44
9)CCC अंबाजोगाई -35
एकून बीड जिल्हा- 197