भारत

चिंताजनक! भारत तिसऱ्या क्रमांकावर

६ जुलै :- देशभरात कोरोनाचा कहर वेगाने सुरु आहे.प्रशासनाच्या अहोरात्र मेहनतीनंतरही कोरोनाबाधित रुग्ण संख्येचा आलेख उंचावतच चालला आहे.देशात गेल्या काही दिवसांपासून नवीन रुग्ण हे 20 हजारांच्या वर आढळत आहेत.भारतातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 7 लाखांच्या घरात गेला आहे. सध्या देशात 6 लाख 97 हजार 413 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यातील 2 लाख 53 हजार 287 सक्रीय रुग्ण आहेत. तर 4 लाख 24 हजार 433 रुग्म निरोगी झाले आहेत. तर, एकूण मृतांची संख्या 19 हजार 693 झाली आहे.

भारतानं रशियाला मागे टाकले असून जगभरातील इतर देशांच्या तुलनेत कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत भारत आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.चिंताजनक बाब म्हणजे देशाचा पॉझिटिव्ह रेट हा 13.42 % आहे. तर मृत्यूदरही वाढत आहे.
काळजी घ्या…गर्दी टाळा… मास्क वापरा…सोशल डिस्टन्स ठेवा… प्रशासनाच्या सूचनेचं पालन करा!