Popular News

मोदींच्या दौऱ्यानंतर चीन सैन्याची माघार!

६ जुलै :- भारत -चीन सीमावादानंतर भारत-चीन सीमेवर कायम तणाव निर्माण होत राहिला.याच दरम्यान द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लेह-लडाख येथे भारतीय सैन्याचे मनोधुर्य वाढवण्याकरिता भेट दिल्याने भारत आणि चीनमधील वादानंतर आता मोठी बातमी समोर आली आहे. चीनी सैन्य गलवान खौऱ्यामधील हिंसाचाराच्या ठिकाणापासून सुमारे दीड किमी अंतरावरून मागे हटली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांच्या सैन्यानं स्थानांतरणाबाबत सहमती दर्शविली आहे आणि सैन्याने सद्यस्थितीपासून माघार घेतली आहे. गलवान खौऱ्याजवळ आता एक बफर झोन बनविला गेला आहे, जेणेकरून पुन्हा हिंसाचाराच्या घटना घडू नयेत.

पंतप्रधानांची ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जात होती. कुणालाही थागपत्ता लागू न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 हजार फुटावर असलेल्या लष्कराच्या नीमू पोस्टवर पोहोचले. यावेळी मोदींनी सुमारे 25 मिनिटं जवानांशी संवाद साधला होता. त्यामध्ये एवढ्या उंचीवर, टोकाच्या नैसर्गित परिस्थितीत देशाचं संरक्षण करणाऱ्या जवानांची त्यांनी पाठ थोपटली.