बीड

चिंताजनक रिपोर्ट;आजही बीडमध्ये आढळले कोरोना पॉझिटीव्ह

5 जुलै :- डोळ्यांना न दिसणाऱ्या कोरोना नावाच्या सूक्ष्म विषाणूने जगभर आपले साम्राज्य पसरवले आहे.काटेकोरपणे काळजी घेऊन सुद्धा कोरोना विषाणूंचे संक्रमण झपाट्याने वाढतच आहे, आज सकाळी बीड जिल्ह्यातून तपासणीकरिता पाठवण्यात आलेलय 248 संशयित व्यक्तींचे स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून बीडकरांच्या चिंतेत घरबसल्या भर पडली आहे.आताच बीड आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार 248 संशयित व्यक्तींच्या स्वॅबपैकी 06 स्वॅब पॉझिटिव्ह आले असून 2 रुग्ण बीड शहरातील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.बीडमध्ये कोरोनाचं थैमान सुरु झाल्याचे दिसून येत आहे. बीडकरांना आता आणखी काळजी घेण्याची गरज आहे. दिवसरात्र बीडकरांच्या सेवेसाठी झटणाऱ्या प्रशासनाला बीडकरांच्या सहकार्याची गरज आहे.


काळजी घ्या…गर्दी टाळा… मास्क वापरा…सोशल डिस्टन्स ठेवा… प्रशासनाच्या सूचनेचं पालन करा!

कोविड-19 05/जुलै/2020
आज 06 पॉझिटिव्ह
आजचे स्वॅब – 248
निगेटिव्ह – 239
अनिर्णित – 03
02 -जुना बाजार,बीड –38वर्षीय महिला,11 वर्षीय मुलगा
01-संत कबीर नगर,अंबाजोगाई -40 वर्षीय महिला(अलिबाग हुन आलेली)
02 आष्टी-सुरडी ता आष्टी-30 वर्षीय महिला(मुंबई हुन आलेली)गंगादेवी ता आष्टी-65 वर्षीय पुरुष
01-परळी-58 वर्षीय पुरुष