Popular News

प्रविण तरडेंची मोठी घोषणा!

5 जुलै : अभिनेता आणि दिग्दर्शक प्रविण तरडे नेहमीच आपल्या बिनधास्त स्वभावाकरिता ओळखल्या जातो.प्रविण तरडे यांनी आपल्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. प्रविण तरडे हे त्यांच्या लोकप्रिय ठरलेल्या देऊळ बंद या सिनेमाचा सिक्वल बनवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.

देऊळ बंद – 2…आता परीक्षा देवाची’ या सिनेमाची प्रविण तरडे यांनी फेसबुक लाईव्ह करत घोषणा केली आहे. यावेळी सिनेमाचे निर्मातेही त्यांच्यासोबत उपस्थित होते. ‘देऊळ बंद – 2’ ला आज गुरुपौर्णिमेला आपण आता सुरुवात करतोय आणि पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल, असं सिनेमाच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे.