महाराष्ट्र

मुख्यमंत्री हॉटेल्स,रेस्टॉरंट सुरु करण्याच्या तयारीत?

५ जुलै :- राज्यात कोरोना विषाणूचा कहर दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा,कॉलेज,हॉटेल्स बंद ठेवण्यात आली आहेत.महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान आहे.

हे लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरु करता येईल यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार केली असून ती लवकरच अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी हॉटेल व्यवस्थापनांनी आपल्या कामगार व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नये असंही सांगितले.