गेवराईत कोरोनाचा शिरकाव;काही भागात पूर्णवेळ संचारबंदी लागू
बीड, दि. 5 जुलै: ( प्रतिनिधी ) गेवराई शहरातील कोरोना विषाणूची लागण झालेला रुग्ण आढळून आला आहे, त्यामुळेे गेवराई शहरातील कोल्हेर रोड पश्चिमेकडील संजयनगरचा पूर्ण परिसर, ईसलामपुरा, सावतानगर, जुना धोंडराई रोडच्या उत्तरेकडील पूर्ण परिसरात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत .
गेवराई येथील व्यक्ती अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथे तपासणीद्वारे कोरोना बाधित झाले असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गेवराई शहरातील कोल्हेर रोड पश्चिमेकडील संजयनगरचा पूर्ण परिसर, ईसलामपुरा, सावतानगर, जुना धोंडराई रोडच्या उत्तरेकडील पूर्ण परिसरात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचार बंदी लागू करण्यात आली आहे .
काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापरा…सोशल डिस्टन्स ठेवा…प्रशासनाच्या सूचनेचं पालन करा!