क्राईम

कोविड ऑफिसर म्हणून लुबाडणारा गजाआड

5 जुलै:
एकीकडे कोरोना जीवन विस्कळीत करून ठेवले आहे.आणि दुसरी हाताला काम नसल्यामुळे जगण्याचे वंदे झाले आहेत आणि वरून चोऱ्या करणारे वेगवेगळ्या शक्कल-अक्कल लढवून माणसांना लुबाडत आहेत फसवत आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र पसरलेला आहे आणि याचाच फायदा काही नराधम घेत आहेत.


अब्दुल शेख हे 30 जून रोजी संध्याकाळी 6 च्या सुमारास चेंबूर येथील सरस्वती विद्यालया समोरून चेंबूर स्टेशनकडे जात असताना त्यांना वाटेत दोन भामटे भेटले. त्यांनी स्वतःला कोविड ऑफिसर म्हणून बतावणी करून अब्दुल शेख यांच्याजवळ असलेल्या सामानाची तपासणी केली. अब्दुल शेखजवळ असलेल्या कॅनरा बँकेचे एटीएम घेऊन हातचलाखीने त्याचा पिन नंबर घेऊन अब्दुल शेख यांच्या अकाउंटमधून 54 हजार रुपये काढून घेतले.मात्र कोविड ऑफिसर म्हणून लुबाडणाऱ्या एकाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. तर त्याच्या दुसर्‍याचा शोध पोलिस करत आहेत.