सुरक्षा दलांनी केला दोन दहशतवाद्यांचा खात्मा!
5 जुलै: जम्मू आणि कश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दलांनी हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.या चकमकीत एक जवानही जखमी झाला होता. ठार केलेल्या त्या दोनही दहशतवाद्यांचे पोस्टमार्टेम रिपोर्ट्स मिळाले असून त्यातून धक्कादाय माहिती पुढे आली आहे.
ते दोनही दहशतवादी कोरोनाबाधित असल्याचं आढळून आलं आहे. या रिपोर्ट्स नंतर आता सुरक्षा दलांपुढे आता नवं संकट निर्माण झालं असून दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईच्या वेळी जास्त काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.