मजबुरीपोटी अर्शद वारसी विकतोय किडनी!
५ जुलै :- देशभर सध्या कोरोनाच थैमान सुरु आहे आणि माणसं घर बसल्या विजेचे आलेले बिल पाहून हैराण आहेत.चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री तापसी पन्नू, रेणुका शहाणे नंतर आता अभिनेता अर्शद वारसी यास आलेले विजेचे बिल पाहून धक्का बसला आहे.कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यांपासून अनेकांच्या हाताला काम नाही. अशा परिस्थितीत लोक कसंबसं संसार सांभाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यात बॉलिवूडमध्येही विविध कलाकारांना आपलं विजेचं बिल पाहून धडकी भरली आहे.
अर्शद वारसी याने विजेचं बिल भरण्यासाठी आपल्या पेंटिग्स विक्रीसाठी काढल्या आहेत. एका वृत्तपत्राशी बोलताना त्याने आपले अनुभव शेअर केले. त्याने चाहत्यांना पेंटिग्स विकत घेण्याची मागणी केली आहे. मला अदानीचं विजेचं बिल भरण्यासाठी पैशांची गरज असल्याने माझी पेंटिग्स खरेदी करा असं त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. “माझ्या किडण्या मी पुढील बिलासाठी राखून ठेवत असल्याचेही त्याने या ट्विटमध्ये म्हणले आहे.”