पंतप्रधान मोदींनी घेतली राष्ट्रपतीं कोविंद यांची भेट
५ जुलै :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लेह दौऱ्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची रविवारी सकाळी 11.30 वाजता भेट घेतली. या भेटीमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अनेक मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
भारत-चीन वादामुळे सीमेवर निर्माण झालेला तणाव,कोरोना विषाणूचा वाढत प्रादुर्भाव,पाकिस्तानकडून होणारं शस्त्रसंधीचं उल्लंघन यासारख्या देशासमोर असलेल्या महत्त्वपूर्ण आव्हानांवर सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.