राजकारण

संरक्षण मंत्र्यांनी दिला चीनला इशारा

5 जुलै : पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैन्य यांच्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीनला थेट इशारा दिला आहे. कोविड सेंटरचे निरीक्षण करण्यासाठी दिल्ली येथे पोहोचलेले संरक्षणमंत्री म्हणाले की, भारत प्रत्येक आघाडीवर सज्ज आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे कोविड – 19 रूग्णांच्या उपचारांसाठी बनवलेल्या 1,००० खाटांच्या तात्पुरत्या रुग्णालयाला भेट देण्यासाठी आले होते.त्याचवेळी चीनविषयी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, “आम्ही प्रत्येक आघाडीसाठी तयार आहोत, ती सीमा असो की रुग्णालय, आम्ही कधीच तयारीत मागे पडत नाही.”