धक्कादायक!मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांसह अनेक अधिकाऱ्यांची कोरोना चाचणी
4 जुलै : सर्वत्र कोरोनाचा धुमाकूळ सुरु आहे.बिहारच्या प्रशासनात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे.मुख्यमंत्र्यांपासून ते अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असण्याची शक्यता आहे.
दोन दिवसांपूर्वीच बिहारच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीचा कार्यक्रम विधानपरिषदेत झाला. आता विधानसभेचे सभापती अवधेश नारायण सिंह हे स्वतःच कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. स्वतः मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी टेस्ट करून घेतली आहे. त्यांच्या चाचणीचे रिपोर्ट येणं बाकी आहे.