महाराष्ट्र

राज्यात आज रेकॉर्डब्रेक नव्या रुग्णांची नोंद!

4 जुलै :- राज्यात कोरोना विषाणूने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.दिवसेंदिवस राज्यात रुग्णांची विक्रमी नोंदहोत आहे. 24 तासांत राज्यात 7074 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 200064 वर गेली आहे.

आज 295 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूची एकूण संख्या 8671वर गेली आहे. तर मुंबईत रुग्णांची एकूण संख्या 83237 वर गेली असून फक्त मुंबईत आत्तापर्यंत 4830 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.आज नवे रुग्ण, मृत्यूची संख्या आणि एकूण संख्या या तिनही गोष्टींमध्ये विक्रमी वाढ झाली असून प्रशासन आणि सरकारची डोकेदुखी वाढली आहे.