चिंतेत भर! बीडमध्ये आजही आढळले पॉझिटिव्ह रुग्ण
४ जुलै :- आज बीड जिल्ह्यातून तपासणीकरिता पाठवण्यात आलेली सर्वाधिक 251 संशयित व्यक्तींचे स्वॅब पाहून आज बीडकर घरबसल्या चांगलेच चिंतेत होते. आणि अजून बीडकरांच्या चिंतेत भर पडली आहे. आताच बीड आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार 251 संशयित व्यक्तींच्या स्वॅबपैकी 09 स्वॅब पॉझिटिव्ह आले असून २ रुग्ण बीड शहरातील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.बीडमध्ये कोरोनाचं थैमान सुरु झाल्याचे दिसून येत आहे. बीडकरांना आता आणखी काळजी घेण्याची गरज आहे. दिवसरात्र बीडकरांच्या सेवेसाठी झटणाऱ्या प्रशासनाला बीडकरांच्या सहकार्याची गरज आहे.
काळजी घ्या…गर्दी टाळा… मास्क वापरा…सोशल डिस्टन्स ठेवा… प्रशासनाच्या सूचनेचं पालन करा!
कोविड-19 04/जुलै/2020
आज 09 पॉझिटिव्ह
आजचे स्वॅब – 251
निगेटिव्ह – 242
अनिर्णित – 0
05 -परळी –28वर्षीय पुरुष,32 वर्षीय पुरुष,29 वर्षीय पुरुष,35 वर्षीय पुरुष,55वर्षीय पुरुष
01-राळेसांगवी ता शिरूर-,45 वर्षीय पुरुष (भिवंडीहुन आलेले)
01-अजीज पुरा ,बीड -40 वर्षीय महिला
01-डीपी रोड,बीड-45वर्षीय महिला
01- बागझरी ता अंबाजोगाई-65 वर्षीय महिला (पुण्याहून आलेले)