अबब..!जगातलं पहिलं सोन्याचं हॉटेल
४ जुलै :- आतापर्यंत अनेक गोल्ड मॅन, सोन्याच्या दुचाकी, चारचाकी पाहिल्या असतील. आपल्या देशात तर सोन्याची अनेक मंदिरंही आहे. मात्र, आता चक्क सोन्याच्या हॉटेलची निर्मिती करण्यात आली आहे. हे जगातील पहिलं सोन्याचं हॉटेल मानले जात आहे. व्हिएतनामची राजधानी हनोईही या ठिकाणी हे सोन्याचं हॉटेल आहे.
दोन जुलै म्हणजेच गुरुवारी या हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्याच दिवशी ग्राहकांनी या हॉटेलमध्ये राहण्यासाठी गर्दी केली होती. या हॉटेलच्या भिंती आणि शॉवरही गोल्ड प्लेटेड आहेत. जगातील पहिले सोन्याचे हॉटेल व्हिएतनामची राजधानी हनोईमध्ये खुले झाले आहे. येथे दरवाजे, कप, टेबल, खिडक्या, नळ, वॉशरुम, भांडी आदी सारेच सोन्याचे आहे.