महापौर कोरोनाच्या विळख्यात; काल उपमुख्यमंत्र्यासह अनेकांच्या होते संपर्कात
४ जुलै :- शहराचे प्रथम नागरिक महापौर मुरलीधर मोहोळ यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. स्वतः मोहोळ यांनी आपल्या ट्विटर हँडलद्वारे याबाबत माहिती दिली आहे. करोनाविरोधात लढा देताना खुद्द महापौरांना करोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान महापौर हे काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कौन्सिल हॉलमधे बोलावण्यात आलेल्या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला अन्य महत्वाचे अधिकारीही उपस्थित होते. त्यामुळे प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे आहे.