Popular News

गायिका कार्तिकी गायकवाड अडकणार विवाहबंधनात

४ जुलै :- ‘सा रे ग म प- लिटिल चॅम्प्स’ची विजेती असलेली गायिका कार्तिकी गायकवाड लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.मधुर आवाजाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी कार्तिकी एका इंजिनिअर तरुणासोबत कार्तिकीचं लग्न होणार असून साखरपुड्याची तारीखही निश्चित करण्यात आली आहे.

26 जुलैला मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा साखरपुड्याचा कार्यक्रम पार पाडला जाणार आहे.कार्तिकीच्या वडिलांनी हे लग्न जमवाताना पुढाकार घेतला आहे. वडिलांच्या मित्रपरिवारातीलच पिसे कुटुंबातील रोनित पिसे याच्यासोबत कार्तिकीची लग्नगाठ बांधली जाणार आहे.