महाराष्ट्र

सावधान! सायबर क्राईमची संख्या वाढली

४ जुलै :- ॲमेझॉनवरुन खरेदी करा आणि त्याची एक ठराविक रक्कम कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी वापरले जाईल, नोकरी देणारा मेल-घरी बसवून तुम्ही काम करुन सहज पैसे कमवू शकता,ऑनलाईन खरेदी स्कॅम,बॉस स्कॅम,टॅक्स स्कॅम अशा अनेक युक्त्याचा वापर कोरोना महामारीच्या काळात सायबर भामट्यांनी नागरिकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने सुरू केला आहे. त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी केले आहे. महाराष्ट्र सायबर विभागाने यातील सातत्याने वापरल्या जाणाऱ्या सायबर भामट्यांच्या कार्यपद्धती वा युक्त्या शोधून काढल्या असून पुढील तपास करत आहेत.

काय खबरदारी घ्यावी…?

1.जर वरील नमूद प्रकारचे काही ई-मेल किंवा मेसेज किंवा फोन आले तर त्यावर लगेच विश्वास ठेऊ नका.
2.सध्याच्या काळात जर कोणी तुम्हाला घर बसल्या पैसे मिळवु शकता असे सांगत असतील तर लगेच विश्वास ठेऊ नका तुम्ही फसविले जाण्याची शक्यता अधिक आहे.
3.ऑनलाईन खरेदी करताना सावधानता बाळगा. एखादी वस्तू जर कोणी बाजारभावापेक्षा खुप स्वस्त विकत असेल तर सतर्क व्हा.
इंटरनेटवर उपलब्ध असलेली सर्व काही माहिती खरीच असेल असे नाही.
3.जर तुम्हाला तुमच्या वरिष्ठांनी gift card coupon भेट दिली आहे असा काही ई-मेल किंवा मेसेज आला तर त्याची वरिष्ठांकडून खात्री करून घ्यावी.
4.जर तुमची वरील नमूद प्रकाराने किंवा अन्य कोणत्याही प्रकारची आँनलाईन आर्थिक फसवणूक झाली असेल तर त्याची तक्रार जवळच्या पोलिस ठाण्यात नोंदवा, तसेच www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर पण माहिती द्यावी. असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आलं आहे.