अजित पवारांच्या जवळची दोघं कोरोनाच्या विळख्यात!
4 जुलै: राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात कोरोनामुक्त झालेल्या बारामतीत कोरोनाचा आणखी धोका वाढला आहे. शनिवारी एकाच दिवशी सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावातील दोन मित्रांना आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत सावळ येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोना संसर्गाची लागण झाली आहे.या सर्वांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.