अभिनेता अजय देवगणने घेतला मोठा निर्णय!
4 जुलै : हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि निर्माता अजय देवगण लवकरच लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये भारतीय सैन्यावर चिनी सैनिकांकडून झालेल्या हल्ल्याची घोषणाा करण्याच्या तयारीत आहे. चित्रपटामध्ये त्या 20 जवानांची कहाणी असणार आहे, जे चिनी सैन्याचा सामना करताना शहीद झाले होते.
याबाबत अद्याप स्पष्टता नाही आहे की, या सिनेमामध्ये अजय देवगण स्वत: काम करणार आहे की नाही. सिनेमामध्ये काम करणारे कलाकार आणि इतक क्रू अद्याप निश्चित करणे बाकी आहे. या सिनेमाचे सहनिर्माते अजय देवगण फिल्म्स आणि सिलेक्ट मीडिया होल्डिंग्ज एलएलपी असणार आहेत.