कोरोनाच्या नावाखाली निवडणुकांची तयारी सुरु?
४ जुलै :- दिवसेंदिवस वेगाने वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे नवी मुंबई कोरोनाचे हॉट्स्पॉट बनत चालला आहे.नवी मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 7 हजार 088 वर पोहोचली आहे. तर कोरोनाबळींचा आकडा 224 इतकी झाली आहे.अचानकच नेत्या मंडळींना कोरोनाबाधित रुग्णांचा कळवळा लागला आहे.कारण मागील काही दिवसापासून नवी मुंबईकरांची काळजी असल्याने अनेक मोठे राजकीय नेते नवी मुंबईमध्ये येत आहेत.म्हणून सर्व सामान्य माणसांच्या मनात प्रश्न उभा राहत आहे की हि सर्व राजकारणी अचानक नवी मुंबई मध्ये का येत आहेत.
कारण पण तेवढंच गमतीचा आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला की नवी मुंबईत निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे.आता जर जनतेच्या सेवार्थ राजकीय मंडळी उतरली नाही तर जनता निवडणुकीत ठेंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही. पण या नेत्यांच्या दौऱ्यांनी नवी मुंबईकरांना काही भेटणार आहे की केवळ निराशाच हाती लागणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.