महाराष्ट्र

प्रिया बेर्डे करणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश!

४ जुलै :- दर्जेदार अभिनयाच्या जोरावर चित्रपट सृष्टीत आपलं नाव अजरामर करणाऱ्या अभिनेत्री प्रिया बेर्डे सतत नवं नवीन गोष्टी आत्मसात करत असतात.याचप्रमाणे प्रिया बेर्डे एक नवीन दर्जेदार खेळी खेळण्याकरिता सज्ज झाल्या आहेत.अभिनेत्री प्रिया बेर्डे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याची माहिती त्यांनी स्वतः वृत्त वाहिन्यांशी बोलताना दिली.

“आपण सतत काहीतरी नवं करत राहायला हवं. मी याकडे नवी संधी म्हणून पाहाते. लॉकडाऊन काळात अनेक कलाकार, रंगमंच कामगाारांवर ओढवलेलं संकट पाहून मी मदत करत होते. अनेक राजकीय मंडळींशी माझी ओळख होती. पण असा पक्ष प्रवेश करायचं काही निश्तिच नव्हतं. पण काही दिवसांपूर्वी अजित पवार आणि सुप्रिया ताई यांच्याशी बोलणं झाल्यानंतर पक्षात येण्याबद्दल बोलणं झालं. त्यांनी मला या पक्षात येण्याबद्दल सुचवलं. मलाही ही कल्पना आवडली. काहीतरी नव्यानं संघटनात्मक पातळीवर काम करता येईल.

मी पक्षात प्रवेश करतेय म्हणजे राजकारणात मी उतरणार नाही. पक्षाची सांस्कृतिक विभागाची काही जबाबदारी मी सांभाळणार आहे. आता ती काय असेल कशी असेल याची घोषणा 7 जुलैला होईल.”