News

अक्षयकुमारचा ‘तो’ नाशिक दौरा वादाच्या भोवऱ्यात, भुजबळ यांनी दिले चौकशीचे आदेश

नाशिक, 4 जुलै: बॉलिवूड अभिनेता अक्षयकुमार याचा नाशिक दौरा आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. लॉकडाऊनचे नियम डावलून अक्षयकुमारला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा हा प्रकार धक्कादायक आहे. ग्रामीण भाग असताना अक्षय कुमारला शहर पोलिसांचा एसकोर्ट कसा ? या प्रकरणाची पालकमंत्री छगन भुजबळांनी गंभीर दखल घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे दिले आहेत. मुख्यमंत्र्यापासून सगळे मंत्री गाडीतून फिरत असताना अक्षय कुमारला हेलिकॉप्टरची परवानगी कशी? असा सवाल देखील छगन भुजबळ यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

अक्षय कुमार नुकताच नाशिकदौऱ्यावर आला होता. त्र्यंबकेश्‍वरला तो हेलिकॉप्टरनं दाखल झाला होता. एवढच नाही तर अक्षय एक दिवस मुक्‍कामी राहिला होता. नाशिकमध्ये दाखल झाल्याचे अक्षयचे छायाचित्र व्हायरल होताच …

दरम्यान, नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

नाशिक शहरासह जिल्ह्यात एकूण 4864 कोरोना पॉझिटिव्ह आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी कोविड सेंटरची पाहणी केली.

ठक्कर डोममध्ये 350 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. निमा संस्थेतर्फे ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात येणार आहे.  ज्या व्यवस्था कमी पडतील त्या शासनाच्या वतीने केले जाणार असल्याची माहिती भुजबळ यांनी यावेळी दिली.