महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन!
३ जुलै :- राज्यात सर्वत्र कोरोनाचा कहर सुरु आहे. आणि हा कोरोनाचा कहर त्वरित संपेल असा अंदाज सुद्धा बांधणे सध्य परिस्थितीत शक्य होत नाहीए. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना महाविद्यालयात न बोलावता ऑनलाइन प्रवेशाची सुविधा उपलब्ध करून द्या असे पत्र राज्याच्या मुख्य सचिवांनी राज्याच्या सर्व विद्यापीठांना पाठवला आहे.
लॉकडाऊन उठल्यानंतर एक ऑगस्टपासून द्वितीय व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या अध्यापनास सुरुवात करावी असे या आदेशात स्पष्टपणे सांगण्यात आला आहे. मागील वर्षी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आश्वासीत प्रवेश दिला जाईल. गैरहजर आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा बरोबर महिन्यात घेण्याचे नियोजन आहे. अंतिम वर्षाचे विद्यार्थी वगळता सर्व अभ्यासक्रमाच्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्षात तथा सत्रात प्रवेश घेण्यासाठी पात्र समजून प्रवेश दिला जाणार आहे. संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच महाविद्यालयीन स्तरावर होईल.