महाराष्ट्र

राज्यात आजही कोरोनाचं मीटर वेगानेच सुरू!

३ जुलै :- राज्यात कोरोनाच मीटर वेगानेच सुरु आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून दिवसेंदिवस परिस्थिती चालली आहे. महाराष्ट्रात करोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढताना दिसत आहे. करोना बाधित रुग्णांची संख्या आता २ लाखांच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे. २४ तासांत राज्यात दिवसभरात ६ हजार ३६४ नवीन रुग्णांची नोंद झाल्यानं चिंता अधिक वाढली आहे.

एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या आता १ लाख ९२ हजार ९९० झाली आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.