बीड

बीड-कोरोनाचा कहर सुरूच!आजही धक्कदायक रिपोर्ट

आज बीड जिल्ह्यातून तपासणीकरिता पाठवण्यात आलेली सर्वाधिक १८८ संशयित व्यक्तींचे स्वॅबमुळे आज बीडकर घरबसल्या चांगलेच चिंतेत होते. आणि अजून बीडकरांच्या चिंतेत भर पडली आहे. आताच बीड आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार १८८ संशयित व्यक्तींच्या स्वॅबपैकी २ स्वॅब पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. बीडमध्ये कोरोनाचं थैमान सुरु झाल्याचे दिसून येत आहे. बीडकरांना आता आणखी काळजी घेण्याची गरज आहे. दिवसरात्र बीडकरांच्या सेवेसाठी झटणाऱ्या प्रशासनाला बीडकरांच्या सहकार्याची गरज आहे.
काळजी घ्या…गर्दी टाळा… मास्क वापरा…सोशल डिस्टन्स ठेवा… प्रशासनाच्या सूचनेचं पालन

आज पाठविलेले स्वॅब – 188
निगेटिव्ह अहवाल – 173
*पॉजिटिव्ह अहवाल – 02

  • इंनकनकलुसिव्ह- 13
    1) वय 17 पु, रा. आजीजपुरा,बीड
    2) वय 25 स्त्री, रा गिरवली ता भूम जिल्हा उस्मानाबाद