महाराष्ट्र

बालकाची मृत्यूशी यशस्वी झुंज!

3 जुलै : आपल्या घरात नवा छोटा पाहुणा आल्यानंतर त्याचा आनंद संपूर्ण कुटुंबाला होतो. असाच आनंद अहमदनगरमधील कुटुंबालाही झाला. त्यांच्या घरी चिमुकला पाहुणा आला. कोरोना काळात या बाळाचा जन्म झाला मात्र बाळ निरोगी होतं. मात्र आठवडाभरानंतर त्याला हृदयदोष असल्याचं निदान झालं. त्याच्यावर गुंतागुंतीची अशी शस्त्रक्रिया करून त्याचा जीव वाचवण्यात आला आहे.