पतंजलीच्या औषधाला अधिकृत मान्यता नाही!
३ जुलै :- पतंजलीने कोरोनावर काढलेल्या औषधाचा वाद अजुन संपलेला नाही. पतंजलीच्या औषधाला अधिकृत मान्यता नाही त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या खोट्या जाहीरातींना बळी पडू नये असं मत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं. ते म्हणाले या औषधाला अजुन मान्यता मिळालेली नाही. त्याचा अभ्यास केला जात आहे. औषधाच्या खोट्या जाहिरातींपासून सावध राहा. या औषधाची विक्रीही राज्यात करता येणार नाही असंही त्यांनी सांगितलं.